पुणे : पुणे महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदासाठी भाजप आणि कॉग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या दोन्ही पक्षांनी पालिका निवडणुकीत पराभुत झालेल्यांना संधी दिलेली नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार ) पक्षाने अनुभवी आणि युवा याचा समतोल साधला आहे.
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे ११९, दोन्ही राष्ट्रवादी ३०, कॉंग्रेस १५ आणि उद्धवसेनेचे १ नगरसेवक निवडून आले. पुणे महापालिकेत २०१७ साली स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती. पण, २०२३ ला राज्य सरकारने या आदेशात बदल केला. त्यानुसार पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली आहे. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २, कॉंग्रेसचे १ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये स्विकृत नगरसेवकपदासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. यापदासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती. त्यात एक अपवाद वगळती सर्व नवीन चेह०यांना संधी मिळाली आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत मुदत होती. त्यात स्विकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपने स्विकृत नगरसेवकपदासाठी निलेश कोंढाळकर, प्रियांका शेंडगे , विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवि साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित ,उदय लेले यांना नवीन चेह०यांना संधी दिली आहे.
कॉग्रेसकडुन सुनील शिंदे
काँग्रेसच्या १ स्विकृत नगरसेवकपदाच्या जागेसाठी मोठी चुरस होती. पालिका निवडणुकीत पराभुत झालेले अनेक दिग्गजांनी यापदासाठी मोठी फिल्डींग लावली होती. पण कॉग्रेसने कामगार नेते सुनील शिंदे यांना स्विकृत नगरसेवकपदासाठी संधी दिली आहे. शिंदे यांच्या रूपाने कॉग्रेसने नवीन चेहरा दिला आहे.
धनकवडे यांचा राजकीय पुर्नवसन
राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेवक माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यांना संधी दिली आहे. त्यामध्ये जुन्या आणि नव्याचा मेळ घालण्यात आला आहे. यामध्ये या पक्षाने युवा याचा समतोल साधला आहे. दत्तात्रय धनकवडे यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला. धनकवडे यांना स्विकृत नगरसेवकपदी संधी देउन त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात आले आहे. भाजप, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारामध्ये धनकवडे हेच जुने उमेदवार आहेत.
भाजपने शब्द पाळला, पराभुतांना दिली नाही संधी
पालिका निवडणुकीत पराभुत झालेल्यांना भाजप स्विकृत नगरसेवक करणार नाही, अशी भुमिका जाहीर केली होती. त्यानुसार भाजपने नवीन चेह०यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने शब्द पाळला आहे.