शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो, ५० तोळं सोनं…"; चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:08 IST

BJP Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

पुण्यामध्ये हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पती, सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती मगर चौधरी असं महिलेचं नाव आहे. याप्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी तक्रार दिली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही सरपंच आहे. तर सासरा शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो…" असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच "हुंडा म्हणजे पैशांचा नाही, आयुष्याचा सौदा असतो. पालकांनो, मुलीच्या “सुखासाठी” हुंडा देणं म्हणजे सुरक्षितता नाही—आता तरी जागे व्हा" असं म्हटलं आहे.  "पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो… उच्चशिक्षित दीप्ती चौधरीने सासरच्या अमानुष जाचाला कंटाळून आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसमोर आत्महत्या.  ५० तोळे सोनं, ३५ लाख रुपये व कारसाठी २५ लाख देऊनही छळ थांबला नाही. मुलगी झाली म्हणून दोष, गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचा दबाव—सलग ६ वर्षांचा छळ अखेर असह्य ठरला आणि दीप्तीने आयुष्य संपवलं."

"याप्रकरणात पती रोहन चौधरी, सासरे कारभारी चौधरी, सासू सुनीता चौधरी व दीर रोहित चौधरी ताब्यात आहेत. पद, शिक्षण, प्रतिष्ठा कोणालाही वाचवणार नाही. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होणारच... पण मुलींनो—उच्च शिक्षण घेताय तर हुंड्याविरुद्ध उभं राहण्याची धमक ठेवा. हुंडा म्हणजे पैशांचा नाही, आयुष्याचा सौदा असतो. पालकांनो, मुलीच्या “सुखासाठी” हुंडा देणं म्हणजे सुरक्षितता नाही—आता तरी जागे व्हा" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

दिप्ती चौधरीचं लग्न रोहन कारभारी चौधरी याच्याशी झालं होतं. लग्नामध्ये ५० तोळं सोनं देण्यात आलं. लग्नानंतर २५ डिसेंबर २०१९ पासून २४ जानेवारी २०२६ दरम्यान दिप्तीकडे चारचाकी वाहन घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येत होती. तसेच एक महिन्यानंतर तिला सासरकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला.

चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली कामं येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत तिचा छळ करण्यात आला. वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे घेतले जात होते. तसेच तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून दिप्ती हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dowry harassment leads to suicide; Chitra Wagh expresses outrage.

Web Summary : A Pune woman, Deepti, committed suicide due to dowry harassment. BJP leader Chitra Wagh condemned the incident, highlighting demands for gold, money, and a car. The husband, in-laws, and brother-in-law are arrested. Wagh urged women to stand against dowry.
टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी