Pune | नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:21 IST2023-04-20T12:19:48+5:302023-04-20T12:21:13+5:30

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

Bike rider killed in collision with speeding truck in New Katraj tunnel pune accident news | Pune | नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune | नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

धनकवडी (पुणे) : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महादेव बापू पिंगळे (वय २५, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस शिपाई प्रकाश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार महादेव मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाला होता. नवीन कात्रज बोगद्यात सकाळी भरधाव ट्रकने दुचाकीस्वार महादेवला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. दुचाकीस्वार महादेवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

Web Title: Bike rider killed in collision with speeding truck in New Katraj tunnel pune accident news