गाडी घासल्याने दुचाकीस्वाराची मारहाण; रिक्षाचालकाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:56 IST2023-02-08T10:56:29+5:302023-02-08T10:56:43+5:30

पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींचा माग काढून दोघांना अटक केली

Bike rider beaten by car; Rickshaw driver dies | गाडी घासल्याने दुचाकीस्वाराची मारहाण; रिक्षाचालकाला मृत्यू

गाडी घासल्याने दुचाकीस्वाराची मारहाण; रिक्षाचालकाला मृत्यू

पुणे : रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात गाडी घासल्याने झालेल्या वादातून दुचाकीस्वार तरुणाने केलेल्या मारहाणीत रिक्षाचालकाला मृत्यू झाला. सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळ सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता ही घटना घडली.

किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. खून केल्यानंतर पसार झालेल्या दोघांना दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या. मुकील गफूर शेख (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मृत किरण यांचा भाऊ मधुकर राजू दांडेकर याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरवरून पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींचा माग काढून दोघांना अटक केली.
 

Web Title: Bike rider beaten by car; Rickshaw driver dies