अज्ञात वाहनाची बाईकला जोरदार धडक, चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 08:52 IST2018-05-23T08:52:15+5:302018-05-23T08:52:15+5:30

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वाकसई फाटा याठिकाणी एका बाईकला अज्ञात वाहनाने धडक दिली.

Bike met with an accident on mumbai-pune national highway, 2 dead | अज्ञात वाहनाची बाईकला जोरदार धडक, चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची बाईकला जोरदार धडक, चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू

लोणावळा - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वाकसई फाटा याठिकाणी एका बाईकला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातात बाईकवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तर चार जण जखमी झालेत. मृतांमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. पती-पत्नी व चार मुले असे एकूण 6 जण बाईकवरुन लोणावळ्याच्या दिशेनं प्रवास करत होते.

साबु जुम्माना भंडारी (वय 35 वर्ष), पूजा साबु भंडारी (वय 3 वर्ष) या दोन जणांचा अपघातात मृत्यू झाला असून रेणका साबु भंडारी (वय 30), कृष्णा साबु भंडारी (वय 10), रामु साबु भंडारी (वय 7), भागाम्मा उडचक्रम (वय 12) हे जखमी झाले आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबु भंडारी त्यांची पत्नी रेणका व चार मुले आपल्या बाईकवरुन (MH 14 BQ 2155) वरुन पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या बाजूने लोणावळ्याकडे येत होते. यावेळी मागील बाजूनं आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली व भीषण दुर्घटना घडली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Bike met with an accident on mumbai-pune national highway, 2 dead