शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 5:55 AM

पवित्र पाेर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार झाले होते हैराण

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पसंतीक्रम देण्याची मुदत अखेर १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढऱे यांनी गुरुवारी रात्री ही माहिती दिली.

पवित्र पोर्टलवर माहिती भरताना   मागील दाेन दिवसांपासून उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. लॉगिन न होणे, प्रेफरन्स असाईन करीत असताना पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले होते. पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करणारे हजारो मेलदेखील शिक्षण आयुक्तालयाला मिळाले होते.   पवित्र पोर्टलवर उमेदवारांना साेमवारपासून (दि. ५) प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ६ आणि ७ फेब्रुवारी राेजी प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि त्यानंतर ८ आणि ९ फेब्रुवारी राेजी प्राधान्यक्रम लाॅक करावेत, असे सांगण्यात आले होते. आता ही मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत असेल. लॉगिन न होणे, मध्येच पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले आहेत. 

प्राधान्यक्रम भरताना अनेक उमेदवार गोंधळून गेले आहेत आणि त्यात पाेर्टल व्यवस्थित चालत नाही. नियम बदलाचा फटका अनेक उमेदवारांना बसल्यामुळे फॉर्म भरताना एरर येत आहे. प्रशासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयात मदत केंद्र सुरू करावे - संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड्.,बी. एड्. स्टुडंट असोसिएशन

अर्ज भरण्याच्या मागणीस मुदतवाढ दिली आहे. याबाबत आलेल्या सूचनांची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले.

ई-मेलवर तक्रारींचा पाऊस nउमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्व-प्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.nप्राप्त ई-मेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. ई-मेलची संख्या पाहता उत्तरे प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मंगळवारपर्यंत ५७००० उमेदवारांची नोंदणीपवित्र पाेर्टलवर गेल्या साेमवारी रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ हजार जणांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते.त्यानंतर मंगळवारी रात्री ८:०० पर्यंत ५७ हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते. बुधवारपासून पाेर्टलवर तांत्रिक अडचण येण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले.शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी दुपारी अचानकपणे  ४:०० ते ६:०० या कालावधीत देखभाल दुरुस्तीसाठी पवित्र पाेर्टल बंद ठेवले हाेते.मात्र, त्यानंतरही प्राधान्यक्रम भरण्यास अडचणी येतच आहेत. ८  फेब्रुवारीपासून  प्राधान्यक्रम लाॅक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार हाेती.मात्र, सायंकाळपर्यंत ही सुविधा सुरू झाली नाही. गुरुवारी सायंकाळी तर पाेर्टल ठप्प पडल्याचेही अनेक उमेदवारांनी सांगितले.   

१,६३,०००टेट- २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रमाणित करून घेतले आहे. 

५७.०००उमेदवारांनी  मंगळवारी रात्री ८:०० पर्यंत प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते.  

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकPavitra Portalपवित्र पोर्टल