शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 06:53 IST

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमधील रिक्त जागा भरण्यासाठी २०१० नंतर दिलेले आरक्षण २०१२ च्या अधिनियमान्वये कोलकाता उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. त्यानुसार बंगालमधील सुमारे ४२ प्रवर्गांचा ओबीसी दर्जा न्यायालयाकडून रद्दबातल ठरविण्यात आला; परंतु या अधिनियमानुसार नोकरी मिळालेल्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अधिनियम १९९३ अंतर्गत राष्ट्रीय आयोगाचे आदेश व सल्ला हा राज्य विधिमंडळाला पाळावा लागतो. त्यांच्या आदेशाविना व मान्यतेविना राज्य सरकारला ओबीसींच्या राज्य सूचीमध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करणे वा एखाद्या प्रवर्गाचे ओबीसी आरक्षण काढता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पश्चिम बंगाल मागासवर्गीय (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना वगळून) कायदा २०१२ अंतर्गत ओबीसींचा लाभ मिळालेल्या अनेक प्रवर्गांचे आरक्षण काढण्यात आले. 

६६ प्रवर्गांचे आरक्षण कायम२०१० पूर्वी राज्य सरकारने ६६ प्रवर्गांना दिलेला ओबीसी दर्जा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला नाही. कारण त्याविरोधात कोणताही आव्हान याचिका दाखल झाली नव्हती. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

रोजगाराची सर्वांना समान संधी मिळावीन्यायमूर्ती मंथा यांनी दिलेल्या निकालाला सहमती दर्शवित न्या. चक्रवर्ती म्हणाले, सार्वजनिक नोकऱ्यांच्या संधी सर्वांना समान मिळावी, मग तो व्यक्ती खुल्या प्रवर्गातील असो वा आरक्षित प्रवर्गातील. आरक्षणाचा लाभ देताना नियमांचे राज्य सरकारकडून वा अधिकाऱ्यांकडून भंग होऊ नये. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणHigh Courtउच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगाल