Join us  

चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सामन्यावर पकड घेतलेली दिसतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:05 PM

Open in App

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने सामन्यावर पकड घेतलेली दिसतेय. यशस्वी जैस्वालने दमदार फटकेबाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना हैराण केले. त्यात RCB कडून गचाळ क्षेत्ररक्षण झाले, ग्लेन मॅक्सवेलकडून सोपा झेलही सुटला. पण, विराट कोहली याला अपवाद ठरला आणि त्याने एक भन्नाट थ्रो करून ध्रुव जुरेलला रन आऊट केले. त्याचे हे क्षेत्ररक्षण पाहून अनेकांना स्तब्ध केले आणि स्टेडियमवर उपस्थित जानवी कपूरही नाचताना दिसली. 

कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

RR च्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल व टॉम कोह्लेर-कॅडमोर ( २०) यांनी पहिल्या विकेटसाठी ५.३ षटकांत ४६ धावा जोडल्या. कर्णधार संजू सॅमसन व यशस्वी यांनीही चांगला खेळ केला होता, परंतु कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी बाद झाला. त्याने ३० चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. यशस्वीच्या ग्लोव्ह्जला चेंडू लागून यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. कर्ण शर्माने RR च्या संजूला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली, परंतु पुढच्या षटकात त्याची विकेट मिळवली. संजू १७ धावांवर यष्टिचीत झाला.  RR ने १० षटकांत ८६ धावांवर ३ फलंदाज गमावले होते. १४व्या षटकात विराट कोहलीच्या भन्नाट थ्रोवर ध्रुव जुरेलला ( ८ ) रन आऊट होऊन माघारी जावे लागले. ११२ धावांवर RR ला चौथा धक्का बसला. विराटचे हे चपळ क्षेत्ररक्षण पाहून स्टेडियम दणाणून निघाले. RR ला ३६ चेंडूंत ५८ धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या हातात सहा विकेट्स होत्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स