कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या इनिंग्जच्या पहिल्या १० षटकांत सामन्यावर पकड घेतलेली दिसली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:29 PM2024-05-22T22:29:35+5:302024-05-22T22:30:47+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Karn Sharma had a chance to run Sanju Samson out here but kept the ball in his hand, Virat kohli unhappy  | कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या इनिंग्जच्या पहिल्या १० षटकांत सामन्यावर पकड घेतलेली दिसली. यशस्वी जैस्वालने दमदार फटकेबाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना हैराण केले. त्यात RCB कडून गचाळ क्षेत्ररक्षण झाले, ग्लेन मॅक्सवेलकडून सोपा झेलही सुटला. कर्ण शर्माने एक सोपा रन आऊट सोडल्याने विराट कोहली आश्चर्यचकित झालेला दिसला. 

फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video


RCBच्या फलंदाजांनी आयपीएल २०२४ मध्ये RRविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात निराश केले. विराट कोहली ( ३३), कॅमेरून ग्रीन ( २७), रजत पाटीदार ( ३४) व महिपाल लोम्रोर ( ३२) यांनी चांगली खेळी करून संघाला ८ बाद १७२ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला. ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ( ३-०-६-१) RCB वर दडपण निर्माण केले. आर अश्विनने ( २-१९) सलग दोन विकेट्स घेऊन RR ला मोठे यश मिळवून दिले. त्यात युझवेंद्र चहलने धोकादायक विराटची महत्त्वाची विकेट घेतली. आवेश खानने ३ विकेट्स घेऊन RCB चे कंबरडे मोडले. ड्यू प्लेसिस व विराट यांनी २८ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाटीदार व ग्रीन ( ४१ धावा), कार्तिक व लोम्रोर ( ३२) यांनाच चांगली भागीदारी करता आली. 


RR च्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. तिसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालला जीवदान मिळाले. टॉम कोह्लेर-कॅडमोर हा प्ले ऑफमध्ये ओपनिंगला येणारा जॉस बटलर याच्यानंतर इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. यश दयालच्या तिसऱ्या षटकात यशस्वीचा झेल सुटला अन् RR च्या फलंदाजाने चार चौकार खेचून धावगती वाढवली. RCB च्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना या दोघांनी पुढील षटकातही ३ चौकार मिळवले. ग्लेन मॅक्सवेलने पाचव्या षटकात कॅडमोरचा सोपा झेल टाकला आणि विराट निराश दिसला. सहाव्या षटकात ल्युकी फर्ग्युसनने RCB ला पहिले यश मिळवून दिले. कॅडमोर २० धावांवर त्रिफळाचीत झाला.  


मागील काही सामने हरवलेला फॉर्म यशस्वीला आज सापडला आणि त्याने बंगळुरुच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. ९व्या षटकात कर्ण शर्माचा चेंडू संजूने कव्हर्सच्या दिशेने मारला आणि पहिली धाव त्याने वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी त्याने क्रिज सोडले होते, परंतु यशस्वीने त्याला माघारी पाठवले. कर्ण शर्माकडे योग्यवेळी चेंडू आला होता आणि त्याने ठरवले असते तर संजूला रन आऊटही करू शकला असता. कारण, संजूचे पूर्ण लक्ष हे यशस्वीकडे होते आणि तो क्रिजमध्ये परतलाही नव्हता. कर्णने यष्टींवर चेंडू लावलाच नाही आणि संजू सहजपणे क्रिजमध्ये परतला. कर्णचा हा ढिसाळपणा पाहून विराट चकीत झाला. 

Web Title: RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Karn Sharma had a chance to run Sanju Samson out here but kept the ball in his hand, Virat kohli unhappy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.