फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात वादाची ठिणगी पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:39 PM2024-05-22T21:39:16+5:302024-05-22T21:39:43+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Controversy start after Dinesh Karthik wicket, Kumar Sangakkara wanted to meet the 3rd umpire straightaway, Video | फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video

फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात वादाची ठिणगी पडली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामना वादग्रस्त निर्णयाने गाजला. इरफान पठाण, सुनील गावस्कर, वसीम जाफर, मायकेल वॉन यांनी अम्पायरच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. त्याचबरोबर तंत्रज्ञानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयामुळे RR चा प्रशिक्षक कुमार संगकारा संतापलेला दिसला आणि तो तेव्हाच तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागण्यासाठी जाताना दिसला. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात निराश केले. विराट कोहली ( ३३), कॅमेरून ग्रीन ( २७), रजत पाटीदार ( ३४) व महिपाल लोम्रोर ( ३२) यांनी चांगली खेळी करून संघाला ८ बाद १७२ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला. ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ( ३-०-६-१) RCB वर दडपण निर्माण केले. आर अश्विनने ( २-१९) सलग दोन विकेट्स घेऊन RR ला मोठे यश मिळवून दिले. त्यात युझवेंद्र चहलने धोकादायक विराटची महत्त्वाची विकेट घेतली. आवेश खानने ३ विकेट्स घेऊन RCB चे कंबरडे मोडले. 


ड्यू प्लेसिस व विराट यांनी २८ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाटीदार व ग्रीन ( ४१ धावा), कार्तिक व लोम्रोर ( ३२) यांनाच चांगली भागीदारी करता आली. आजच्या सामन्यात रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक ४ झेल घेतले आणि प्ले ऑफमध्ये यष्टिरक्षक वगळता सर्वाधिक झेल घेण्याचा मान त्याने पटकावला.  दिनेश कार्तिक पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला होता आणि गोलंदाज आवेश खानच्या अपीलवर अम्पायरने त्याला बादही दिले. पण, कार्तिकने DRS घेतला. त्यावर तिसऱ्या अम्पायरने हा निर्णय बदलला, परंतु अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते हा निर्णय घाईने आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले. यावरून वातावरण तापले आहे.  
 

Web Title: RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : Controversy start after Dinesh Karthik wicket, Kumar Sangakkara wanted to meet the 3rd umpire straightaway, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.