बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी, पुण्यात ४ ठिकाणी २२ जुलैला रोजगार मेळावे, 'हे' उमेदवार पात्र असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 21:06 IST2025-07-18T21:05:00+5:302025-07-18T21:06:51+5:30

या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार

Big job opportunity for the unemployed, employment fairs to be held at 4 places in Pune on July 22, opportunity for 'these' candidates | बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी, पुण्यात ४ ठिकाणी २२ जुलैला रोजगार मेळावे, 'हे' उमेदवार पात्र असणार

बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी, पुण्यात ४ ठिकाणी २२ जुलैला रोजगार मेळावे, 'हे' उमेदवार पात्र असणार

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व टीकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्स, खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच दिवशी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, शिरुर, आळेफाटा (ता. जुन्नर) व अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी (ता. खेड) येथेही मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.

या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुकांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहेत. मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे. तसेच प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, शिरुर, आळेफाटा, ता. जुन्नर व अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी ता. खेड येथेही २२ जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नामांकित उद्योजक सहभागी होणार असल्याने, स्थानिक उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

नोकरीइच्छुक उमेदवारांना नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक, नायगाव (नसरापूर ता. भोर), व शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शारदानगर (ता. बारामती) येथे करिअर समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम मोफत असून जिल्ह्यातील जास्तीतजास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात प्रत्यक्ष साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Big job opportunity for the unemployed, employment fairs to be held at 4 places in Pune on July 22, opportunity for 'these' candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.