पुणे : आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अपघातानंतरचा विमानाचा चक्काचूर झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाला. या अपघाताचा भयावह सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमधून विमानाचा भयानक स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झाल्याचे या घटनेत दिसून आले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज
अजित पवारांचे विमान मुंबईवरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ झाले होते. तर बारामतीत ते ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. त्यामध्ये अजितदादांसोबत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे व्हीएसआर या खासगी कंपनीचे विमान असल्याची माहिती समोर आली आहे.
लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात कोसळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar reportedly died in a plane crash near Baramati airport. The crash killed six people. The plane caught fire after veering off the runway during landing. The cause is suspected to be a technical malfunction.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार की बारामती हवाई अड्डे के पास एक विमान दुर्घटना में कथित तौर पर मृत्यु हो गई। दुर्घटना में छह लोग मारे गए। लैंडिंग के दौरान विमान रनवे से भटक गया और आग लग गई। तकनीकी खराबी की आशंका है।