भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:40 IST2026-02-20T12:39:11+5:302026-02-20T12:40:41+5:30

- संबंधित तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली असून, तिने शपथपत्र देत अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.  

Bhigwan Kidnapping Case New twist in the Bhigwan case We want our daughter in our custody; Demand of the girl's brother | भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी

भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी

भिगवण (पुणे जि.) - भिगवण येथे घडलेल्या तरुणी पळवून नेल्याच्या कथित घटनेला नवे वळण मिळाले आहे. लग्नाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र संबंधित तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली असून, तिने शपथपत्र देत अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने तरुणासोबत गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील ‘अपहरण’चा आरोप संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना इंदापूर तालुका परिसरात घडल्याने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.



दरम्यान, तरुणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना वेगळी बाजू मांडली. त्या दिवशी आम्हाला मारहाण करून आमच्या डोळ्यात चटणी फेकली आणि माझ्या बहिणीला जबरदस्तीने घेऊन गेले. ती स्वतःहून गेलेली नाही. आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे. अशी मागणी त्याने केली.

पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू
या प्रकरणात दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुणीने दिलेल्या शपथपत्राची पडताळणी आणि कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

Web Title : भिगवण मामले में नया मोड़: भाई ने बेटी की हिरासत मांगी।

Web Summary : भिगवण अपहरण मामले में नया मोड़ आया है क्योंकि लड़की ने अपहरण से इनकार करते हुए दावा किया कि वह स्वेच्छा से गई थी। भाई का कहना है कि उसे मजबूर किया गया और उसकी वापसी की मांग की। पुलिस विरोधाभासी दावों की जांच कर रही है।

Web Title : Bhiganvan case takes a turn: Brother demands daughter's custody.

Web Summary : Bhiganvan kidnapping case twists as the girl claims she left willingly, refuting abduction. The brother insists she was forced and demands her return. Police investigate conflicting claims.