शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:08 PM

माझ्या पदवीवरून टिका होते आहे, मात्र मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी ती पदवी लपवलेली नाही हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले याचा मला आनंदच आहे.

पुणे: माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये, मला पुण्यात शिकायला मिळाले याचा मला अभिमान आहे. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्या फालतू विषयांवरून त्याच्यावर टिका करू नका, खात्यात काम कसे करतो आहे ते पहा असा सल्ला दिला आहे याकडे भाजपने लक्ष द्यावे असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर पदवीकरून टिका करणाऱ्या भाजपाला दिला.मंत्रीपद स्विकारल्यानंतर प्रथमच सामंत पुण्यात आले होते. पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला त्यांनी भेट दिली. ते म्हणाले, ज्या पक्षाने मंत्री केले त्या पक्षाच्या शाखांना, जिल्हा कार्यालयाला भेट देणे, कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणे माझे कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी इथे आलो आहे. माझ्या पदवीवरून टिका होते आहे, मात्र मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी ती पदवी लपवलेली नाही हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले याचा मला आनंदच आहे.

  कोकण विद्यापीठाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तुम्ही कोकण विभागातीलच आहात, आता या प्रस्तावाला गती मिळेल का यावर सामंत म्हणाले, सोलापूरला तेथील ३८ महाविद्यालयांसाठी विद्यापीठ होऊ शकते तर कोकणात तेथील महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ का नको? ते व्हायलाच पाहिजे. कदाचित त्यामुळेच माझ्याकडे उच्च शिक्षण विभाग आला असावा. कोकण विद्यापीठ प्रत्यक्षात यावे यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणारच आहे.    

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण