भांडगावला जीपचालक, मालकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:27+5:302021-02-05T05:04:27+5:30

विशाल रमेश सोनवणे (वय २९, रा. लातूर) यांनी याबाबतची फिर्याद यवत पोलिसात दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ...

Bhandgaon jeep driver, owner robbed | भांडगावला जीपचालक, मालकाला लुटले

भांडगावला जीपचालक, मालकाला लुटले

विशाल रमेश सोनवणे (वय २९, रा. लातूर) यांनी याबाबतची फिर्याद यवत पोलिसात दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या जीपने लातूरवरून पुण्याला जात होते. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा गाडीचा चालक आसिफ हशमुद्दीन सय्यद (रा. पाखरसांगवी, शिवरस्ता, लक्ष्मीनगर, लातूर) हा देखील होता. त्याने जीप भांडगाव गावच्या हद्दीत हॉटेल शिवारसमोर विरुद्ध बाजूला आल्यानंतर थांबविली व तो नैसर्गिक विधीसाठी गेला. यावेळी फिर्यादी बाजूच्या सीटवर झोपले असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्याला चाकू लावून मारण्याची धमकी दिली. तर इतर दोघांनी झडती घेत सीटखाली ठेवलेली रोख रक्कम, मोबाइल घड्याळ व सोन्याची अंगठी काढून घेतली. यावेळी समोरून मॉर्निंग वॉकसाठी करणारे लोक जवळ येत असल्याचे पाहून चोरांनी बाजूच्या काटवणात पळून गेले. समोरून व्यायामासाठी आलेल्या लोकांनीदेखील चोरांना पळून जाताना पाहिले. चोरांनी चालक आसिफ याच्या खिशातील रोख रक्कमदेखील काढून घेतली.

Web Title: Bhandgaon jeep driver, owner robbed