शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकारांवर भानामतीचा पगडा

By admin | Updated: January 13, 2015 05:47 IST

वकीलसाहेब आजची तारीख नको, गुरुजींनी सांगितलंय आज केस आपल्यावर उलटेल... अहो साहेब, तिच्यावर कोणीतरी भानामती केलीय म्हणूनच ती नांदायला येत नाही

पुणे : वकीलसाहेब आजची तारीख नको, गुरुजींनी सांगितलंय आज केस आपल्यावर उलटेल... अहो साहेब, तिच्यावर कोणीतरी भानामती केलीय म्हणूनच ती नांदायला येत नाही... मुलांवर करणी केली असणार म्हणूनच ती भेटत नाहीत... लिंबू मिरची ठेवलीय बॅगेत, आज आपल्याच बाजूने निकाल लागेल... सकाळी नको, दुपारनंतर चांगला मुहूर्त आहे. त्यानंतरच युक्तिवाद करा... कौटुंबिक न्यायालयातील नानाविध कर्मकांडांनी पक्षकारांनाच पछाडलंय अशी परिस्थिती आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या धूसर रेषेला ओलांडून पक्षकार आपल्या खटल्यासाठी निरनिराळ्या कर्मकांडांना आंधळेपणाने सामोरे जातात आणि वकिलांनाही तसे करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात सध्या ४,७३९ केसेस प्रलंबित आहेत. या केसेसमधील किमान ८५० अधिक केसेसमधील पक्षकारांच्या अंधश्रद्धेला कोर्टात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांना तोंड द्यावे लागते आहे. कौटुंबिक न्यायालयातील सुमारे १५-२० टक्के खटल्यांतील पक्षकार अंधश्रद्धेच्या अधीन होऊन खटल्याच्या सुनावणीकडे पाहत असतात. आपल्या खटल्याची चांगली सुनावणी व्हावी म्हणून काही पक्षकार आपल्या वकिलांना अंगारा, प्रसाद देतात. तर काही पक्षकार वकिलांना अंगारा जवळ ठेवण्यास सांगतात, असे अनेक अनुभव कौटुंबिक न्यायालयातील वकिलांना येतात, अशी माहिती पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी सांगितली.काही वेळा सामोपचाराने खटला मिटणार असेल, नात्यात सुधारणा येणार असेल तरीही पक्षकार कोणा साधूबुवाच्या वाणीवर विश्वास ठेवून चालतात आणि नातं मोडतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. वकील युक्तिवाद करत असतात, त्या वेळी न्यायालय कक्षात बसून काहीतरी पुटपुटत असतात. जपमाळ करीत असतात. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मात्र, जेव्हा अंगारा, गंडेदोरे, प्रसाद किंवा पंचांग, गुरुजींचे सांगणे यावर पुराव्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवायला लागतात तेव्हा मात्र वकिलांना याचा मानसिकरित्या त्रास होतो. यासाठी त्यांचे योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यांना श्रद्धा-अंधश्रद्धा यातील भेद पटवून देण्याची गरज आहे यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे कवडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)