भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: August 13, 2016 05:20 IST2016-08-13T05:20:48+5:302016-08-13T05:20:48+5:30

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Bhai Vaidya has been awarded the Punyabhushan Award | भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येईल. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आहेत. रविवारी, दि. २१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

Web Title: Bhai Vaidya has been awarded the Punyabhushan Award