इंदापूर शहरात भरदिवसा घरफोडी

By Admin | Updated: June 25, 2015 03:23 IST2015-06-25T03:23:11+5:302015-06-25T03:23:11+5:30

शहरातील सरस्वतीनगर भागात मंगळवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी चारच्या दरम्यान गुरुकुल सोसायटीत घरफोडीची घटना घडली.

Bhadvisa Gharghadi in Indapur city | इंदापूर शहरात भरदिवसा घरफोडी

इंदापूर शहरात भरदिवसा घरफोडी

इंदापूर : शहरातील सरस्वतीनगर भागात मंगळवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी चारच्या दरम्यान गुरुकुल सोसायटीत घरफोडीची घटना घडली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत अ‍ॅड. संदिपान दामोदर भोसले (रा. गुरुकुल सोसायटी, सरस्वतीनगर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेअंमलदार रशीद शेख दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दहा वाजता कामानिमित्त अ‍ॅड. भोसले हे घराला कुलूप लावून बाहेर गेले. दुपारी चारच्या दरम्यान ते घरी परतले. त्या वेळी बंगल्याच्या दाराचा कोयंडा उचकटण्यात आल्याचे त्यांना दिसले. बेडरूममधील कपाटातील सोन्याची दोन मंगळसूत्रे व एक नेकलेस, असा ८५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Bhadvisa Gharghadi in Indapur city