शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 11:44 IST

पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असाही त्यांचा सल्ला

ठळक मुद्दे प्रशासनाने सत्ताधारी यांच्या सल्ल्याने घाईघाईने निर्णय घेत कुणाचीही पर्वा न करता घरांवर जेसीबी फिरवला. लोकांचा विरोध आणि आक्रोष पाहून तरी माणुसकी दाखवली पाहीजे.

पुणे: पुणे महानगरपालिकेने काल आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर कारवाई केली. पावसाळ्यात कारवाईला परवानगी नसतानाही स्थानिक लोकांची परवा न करता थेट वस्तीत जेसीबी घुसवला. अनेक नागरिक बेघर झाले. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी निषेध व्यक्त करत टीका केली आहे.

''पुणे महापालिकेचे हे काम महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे असून अधिकाऱ्यांचे अशा भयंकर पद्धतीचे वागणे हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देण्यासारखं आहे'' असे ते म्हणाले. पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. आज सकाळी मुंबईत समाजमाध्यमांसमोर ते बोलत होते. 

काळ सकाळी पुण्यातील आंबील ओढा परिसरात पुणे महापालिकेने घाईघाईने झोपड्पट्टीवर अतिक्रमण कारवाई केली. सत्ताधारी राजकीय नेते , नगरसेवक त्याठिकाणी फिरकले नाहीत. वस्तीतून लहान मुलांपासून ज्येष्ठांचा आक्रोष दिसून आला. त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न दिल्याचे नागरिक म्हणत आहेत. त्याच क्षणी नागरिक विरोध करूनही पोलीस आणि महापालिका अधिकारी ऐकत नव्हते. हतबल झालेल्या नागरिकांना अश्रूही अनावर झाले नाहीत.

यावर बोलताना राऊत म्हणाले,  ''पुणे मनपाने काल जे अमानवीय काम केलं. त्याचा मी निषेध करतो. प्रशासनाने सत्ताधारी यांच्या सल्ल्याने घाईघाईने निर्णय घेत कुणाचीही पर्वा न करता घरांवर जेसीबी फिरवला. लोकांचा विरोध आणि आक्रोष पाहून तरी माणुसकी दाखवली पाहीजे. असं मला तरी वाटते.'' 

संजय राऊत यांची सामनाच्या अग्रलेखातूनही पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर सडकून टीका 

पुण्यात ओढ्यालगत असणाऱ्या घरांवर अतिक्रमण करण्यात आले. प्रशासनाने कोणताही मागचापुढचा विचार न करता गरीबांना रस्त्यावर आणले.  या सगळ्या प्रकरणावर आजच्या सामना अग्रलेखातून पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे. पुण्याची सूत्रे बिल्डर्स, जमीन माफियांच्या ताब्यात आहे. गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवणं हा संतापजनक, तितकाच मन हेलावून टाकणारा प्रकार आहे, असं त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसMLAआमदारBJPभाजपाShiv Senaशिवसेना