शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात

By admin | Updated: June 29, 2015 23:53 IST

तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

दौंड : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे इच्छुक उमेदवार आपल्या वॉर्डातून चाचपणी करीत आहेत. एरवी कुणाशी न बोलणारे मात्र आता सर्वसामान्य जनतेशी बोलते झाले आहेत. एखाद्याच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची विचारपूस करणे, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर आपल्या वॉर्डातून माझी उमेदवारी योग्य राहील का, असाही प्रश्न इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. तर, काही महाभागांनी ओल्या पार्ट्या सुरू केल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यात गिरीम, शिरापूर, लिंगाळी, नानवीज, सोनवडी, खानोटा, रावणगाव, नंदादेवी, बोरीबेल, खडकी, स्वामी चिंचोली, मळद, राजेगाव, वरवंड, गार, कुसेगाव, हातवळण, पाटस, कानगाव, गलांडवाडी, बोरीपार्धी, नानगाव, यवत, कासुर्डी, खामगाव, भांडगाव, खोर, मिरवडी, खुटबाव, पिंपळगाव, लडकतवाडी, टाकळी, गोपाळवाडी, वाळकी, पडवी या गावांतील निवडणुका प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार असल्याने गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकींना महत्त्व आले आहे. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, ज्येष्ठ भाजपा नेते वासुदेव काळे, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.