शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मंदीची उच्चशिक्षितांना झळ; अकुशलांना आले ''अच्छे दिन''.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 16:36 IST

पिंपरी-चिंचवड, तळेगाव व चाकण या औद्योगिक परिसरात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत..

ठळक मुद्देबेरोजगारीची समस्या :ऑटोमोबाइल क्षेत्रातील अभियांत्रिकी कर्मचारी व कामगारांवर संकटनवीन तंत्रज्ञान आत्मसात न करण्याची मानसिकताठराविक कामांनाच प्रतिष्ठा असल्याचा समजहाऊस किपिंगमध्ये अकुशलांनाही संधीइंजिनिअरिंग क्षेत्रातील हजारो उच्चशिक्षितांना या औद्योगिक पट्ट्यात रोजगार उपलब्ध

नारायण बडगुजर-  

पिंपरी : वाहन उद्योगात मंदी असल्याने पिंपरी-चिंचवडमधील अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मोठ्या कंपन्यांच्या पुरवठादार असलेल्या लघुउद्योजकांना कामगार कपात करावी लागत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित इंजिनिअरिंगमधील कर्मचारी तसेच उच्चशिक्षितांना मंदीची झळ बसली आहे. मात्र असे असले तरी ''हाऊस किपिंग'' मधील स्वच्छता, सफाई कामगारांना मंदीतही मागणी असल्याने ''अच्छे दिन '' कायम आहेत.     पिंपरी-चिंचवड, तळेगाव व चाकण या औद्योगिक परिसरात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या पट्ट्याला '' ऑटो हब म्हणून ओळखले जाते. या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग पुरविणारे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. यातील अनेक लघुउद्योगांमध्ये आॅटोमोबाइलशी संबंधित इंजिनिअरिंगवर आधारित कामकाज चालते. तसेच काही नामांकित कंपन्यांमध्येही अशा प्रकारचे काम केले जाते. त्यामुळे या इंजिनिअरिंग क्षेत्रातील हजारो उच्चशिक्षितांना या औद्योगिक पट्ट्यात रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र जागतिक मंदी असल्याने त्यातही त्याचा वाहनउद्योगावर मोठा परिणाम झाल्याने यातील अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली आहे.     सणासुदीच्या तोंडावर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यात हंगामी कर्मचारी व कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कायमस्वरुपी नोकरी मिळत नसल्याने हंगामी तत्त्वावर काम केले जाते. असे असतानाही मंदी तसेच विविध कारणांमुळे या कर्मचारी व कामगारांना अचानक कामावरून कमी केले जाते. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने अनिश्चिततेची टांगती तलवार असते. 

हाऊस किपिंग मध्ये अकुशलांनाही संधीप्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेतलेल्या अकुशल बेरोजगारांना हाऊस किपिंगमध्ये सहज काम उपलब्ध होत आहे. हाऊस किपिंगमध्ये साफसफाईच्या कामाचा समावेश असतो. विविध शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, कंपन्या, खासगी आस्थापने आदी ठिकाणी साफसफाईसाठी कामगारांची आवश्यकता असते. मात्र असे काम करण्यास कोणीही सहज तयार होत नाही. त्यामुळे साक्षर होण्यापुरते शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाही ह्यहाऊस किपिंगह्णमध्ये संधी उपलब्ध होतात. अशा व्यक्ती ह्यहाऊस किपिंगह्णमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. 

तंत्रज्ञानात झपाट्याने बदलतंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांकडून रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. असे असतानाही अनेकजण काही वर्षांपूर्वी प्राप्त केलेल्या कौशल्यावर आधारित काम करतात. मात्र, आपल्याकडील कौशल्य काळानुसार विकसित किंवा अद्ययावत करीत नाहीत. परंपरागत कौशल्याच्या आधारे कामाचा शोध घेतात. मात्र, काम मिळत नाही किंवा असलेले कामही सोडण्याची वेळ येते. 

ठराविक कामांनाच प्रतिष्ठा अमूक प्रकारचे काम प्रतिष्ठेचे आहे, त्यामुळे तेच काम करणार, इतर कोणतेही काम करणार नाही, अशी धारणा दिसून येते. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रतिष्ठा संबंधितांच्या कर्तबगारीतून मिळत असते. त्यामुळे मिळेल ते काम करण्याची तयारी असणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी बेरोजगारीला सामोरे जावे लागते. 

सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कायमस्वरुपी कामगार ही संकल्पना सध्या नाही. त्यामुळे हंगामी तत्त्वावरील कामगारांनी त्यांच्याकडील कौशल्य सतत अद्ययावत केले पाहिजे. सर्वच क्षेत्रातील कामगार व कर्मचाºयांसाठी ही बाब महत्त्वपूर्ण आहे. अन्यथा रोजगाराला मुकावे लागणार आहे. - डॉ. दीपक शिकारपूर, तंत्रज्ञान सल्लागार

आॅटोमोबाइलमधील अभियांत्रिकीशी संबंधित कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. याचा पहिला फटका कंत्राटदाराकडील कर्मचाºयांना बसत आहे. मात्र असे असले तरी हाऊस किपिंगवाल्यांना मागणी कायम आहे. कर्मचारी कपात करणाºया कंपन्यांकडून साफसफाईसाठी सातत्याने सफाई कामगारांची मागणी करण्यात येते- रमेश पवार, साईप्रसाद इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस

टॅग्स :PuneपुणेAutomobileवाहनITमाहिती तंत्रज्ञान