शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

सावधान! पॉलिशच्या बहाण्याने फसविणारी टोळी सक्रीय; कर्वेनगरात ७ तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:00 PM

दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़.

ठळक मुद्देचोरट्यांपैकी एक जण अंदाजे ३० वर्षाचा, दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षाचा, दोघेही बोलत होते़ हिंदी चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व एकटे घरात असलेल्यांना लक्ष्य करताना आले दिसून

पुणे : दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़.ही घटना कर्वेनगरमधील मातोश्री कॉलनीत बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली़ याप्रकरणी सुनिता टेके (वय ५०, रा़ मातोश्री कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ टेके या दुपारी घरी असताना दोघे जण त्यांच्याकडे आले़ त्यांना या दोघांनी तुमचे सोन्याचे दागिने चमकून दाखवितो, असे सांगितले़ त्यांच्या बोलण्याला भुलून त्यांनी आपल्याकडील सोन्याचे गंठण व पाटल्या दिल्या़ त्यांनी त्या एका डब्यात टाकल्या व त्यात हळद टाकून काही वेळ गरम करण्यास सांगितले़ हे करत असताना त्यांनी टेके यांची नजर चुकवून आतील दागिने काढून घेतले व ते निघून गेले़ काही वेळाने त्यांनी डबा उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते़ त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला़ या चोरट्यांपैकी एक जण अंदाजे ३० वर्षाचा असून अंगाने मजबूत, बांधा, सावळा रंग, पाढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते़ दुसरा चोरटा अंदाजे २५ वर्षाचा असून अंगाने सडपातळ बांधा, सावळ्या रंगाचा असून त्याने अंगात जर्किन घातले होते़ दोघेही हिंदी बोलत होते़ दागिन्यांना पॉलिश करण्याचा बहाणा करुन येणाऱ्या चोरट्यांना भुलू नका, असे कोणी सांगत असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी यापूर्वी अनेकदा केले आहे़ असे असले तरी अजूनही अनेक जण विशेषत: ज्येष्ठ नागरिक याला फसतात़ हे चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व एकटे घरात असलेल्यांना लक्ष्य करताना दिसून आले आहे़ दुसरीकडे दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात जाऊन तीन महिलांनी पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास करण्याची घटना बिबवेवाडीत घडली़ याप्रकरणी विशाल राठोड (वय ३०, रा़ बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ राठोड यांच्या बिबवेवाडी येथील सिद्धीविनायक टॉवर्समध्ये राठोड ज्वेलर्स हे दुकान आहे़ बुधवारी दुपारी तीन महिला त्यांच्या दुकानात आल्या़ त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन त्यांना वेगवेगळे दागिने दाखविण्यास लावले़ दागिन्यांचे ट्रे काढत असताना त्यांची नजर चुकवून या महिलांनी २ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले़ या महिला गेल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला़ चोरी करताना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये या महिला दिसून आल्या असून बिबवेवाडी पोलीस तपास करीत आहेत़ 

टॅग्स :ThiefचोरPuneपुणे