सावधान! बनावट फेसबुक अकाऊंटवरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:42 IST2021-03-23T15:42:12+5:302021-03-23T15:42:34+5:30
पैसे मागणार्या मेसेजबाबत घ्या दक्षता

सावधान! बनावट फेसबुक अकाऊंटवरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ
पुणे : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्याशी संबंधित मित्रांना पाठवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणाचेही पैसे पाठविण्याचे मेसेज आले तर अगोदर संबंधितांशी थेट संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
नव्या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यात अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या तब्बल २२० अर्ज सायबर पोलिसांकडे आले आहेत. गेल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत अशा १४० तक्रारी आल्या होत्या.
आपण वेगवेगळ्या साईटवर आपले फोटो, माहिती अपलोड करत असतो. त्या फोटो आणि माहितीचा उपयोग करुन सायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडिल आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते. वर भारतात परत आल्यावर तुमचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन भावनिक आवाहन केले जाते. त्यामुळे अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याच्या भावनेतून तुम्ही त्याने सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात. नंतर कधी तरी ते मित्राचे बनावट अकाऊंट असल्याचे समजते. तोपर्यंत मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशा प्रकारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
......
सायबर चोरटे बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे होणार्या फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जवळच्या कोणाकडून पैशांची मागणीचे मेसेज आले असेल तर मदत करण्यापूर्वी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी. ओळखीच्या व्यक्तीकडून आलेली फे्रंड सिक्वेस्ट स्वीकारावी.
राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे
.........