शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडीपीमुळे ‘कही खुशी, कही गम’

By admin | Updated: August 6, 2015 03:25 IST

बीडीपीमध्ये १0 टक्के बांधकामाची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाने जोर

पुणे : बीडीपीमध्ये १0 टक्के बांधकामाची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाने जोर का झटका ठरला आहे. तर या निर्णयाचे शिवसेना, मनसे तसेच रिपब्लिकन पक्षाने स्वागत केले असल्याने शहरात ‘कही खुशी कही गम’चे चित्र आहे, दहा वर्षांपासून राज्यशासनाकडे बीडीपीचे घोंगडे भिजत पडले होते. २00२ मध्ये हे आरक्षण पडल्यानंतर वारंवार त्याला विरोध झाला होता, तर अनेकांनी त्याच्या समर्थनार्थ लढा उभारलेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जैन समिती नेमली होती. या समितीने आपल्या शिफारसींचा अहवालही २0१४ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारला सादर केला होता. मात्र, आघाडी सरकारने हा निर्णय घेतला नाही. जैन समितीच्या शिफारशीनंतर महापालिकेस सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने बीडीपीमध्ये १0 टक्के बांधकामाची मागणी केली होती. त्यास पक्षाच्या शहराध्यक्ष असलेल्या अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनीच विरोध केला होता. मात्र, हा विरोध डावलत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदतीस घेऊन महापालिकेत बीडीपीमध्ये १0 टक्के बांधकामास परवानगी देण्याचा ठराव मंजूर करून घेतला, त्या वेळी सत्तेत आघाडी सरकार होते. मात्र, सात महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाल्यानंतर राज्यात भाजप सरकार सत्तेत आले. त्यामुळे भाजपची १0 टक्के बांधकामाची मागणी मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, या निर्णयाने या दोन्ही पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. त्यामुळे या निर्णयाचे भाजपने स्वागत केले असले, तरी १0 टक्के बांधकामाच्या मागणीसाठी राज्यशासनास विनंती करण्यात येणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीनेही बीडीपी बाबत राज्यशासनाचा निर्णय बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप केला आहे. याच वेळी काँग्रेससह मनसे, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.