शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत धनगर समाजाचा एल्गार

By admin | Updated: July 19, 2014 23:01 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून मागील 6क् वर्षापासून वंचित ठेवले आहे.

बारामती  :  धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून मागील 6क् वर्षापासून वंचित ठेवले आहे. आता नाही, तर कधीच नाही! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत तरतूद केलेले आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आहे. आमचा लढा कोणा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर व्यवस्थाबदलासाठीचा लढा आहे, असे स्पष्टीकरण धनगर अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनी केले. 
पंढरपूरहून निघालेली पदयात्र बारामतीत उद्या ( 21 जुलैला) बारामतीत धडकणार आहे. बारामती या राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या नगरीत  सोमवारी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या पाश्र्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार विजयराव मोरे, कृती समितीचे नेते अॅड. जी. बी. गावडे यांनी सांगितले, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची तरतूद आहे. तशी केंद्र शासनाकडे 1966 आणि 1979 मध्ये शिफारस केली आहे. 199क्मध्ये केंद्र शासनाने धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्याचे लेखी कळविले आहे. त्यामध्ये ‘धनगर’ आणि 
‘धनगड’ हा शब्द एकच आहे, असा अभिप्राय दिला आहे. बिहार, ओडिशा, झारखंड या राज्यांनी खास तरतूद करून अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू केले आहे. 
महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या समाजाचा सामाजिक विकास खुंटला असल्याचे सांगून मोरे म्हणाले, ‘‘आजही धनगर समाज रोजीरोटीसाठी शेळ्या-मेंढय़ापालनाच्या व्यवसायामुळे डोंगरद:यांत फिरत आहे. आरक्षणाची अंमलबजावणी केली असती, तर वेगळे चित्र दिसले असते. आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने समाजातील युवकांमध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे बारामतीत निर्धार सभा आयोजित केली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राज्यभरातून आलेला धनगर समाज बारामतीतून हलणार नाही.’’
या वेळी कृती समितीचे नेते अविनाश मोटे, माणिकराव दांगडे पाटील, बापूराव देवकाते, वसंत घुले, डॉ. विजय कोकणो, गणपत आबा देवकाते, ज्ञानेश्वर बुरुंगले, विजय ठोंबरे आदी उपस्थित होते. 
पंढरपूरहून निघालेली पदयात्र आज निमगाव केतकीत पोहोचली. 
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते 
महादेव जानकर, सहकारमंत्री 
हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी या पदयात्रेत सहभागी झाली. (वार्ताहर)
 
निर्धार मेळाव्याची जय्यत तयारी 
दरम्यान, आरक्षणाच्या सामाजिक लढय़ाच्या निमित्ताने बारामतीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. निर्धार मेळाव्याच्या ठिकाणाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरी’ असे नाव दिले आहे. तर, सभास्थानाला महात्मा फुले यांचे नाव दिले आहे. कृती समितीचे नेते हनुमंत सूळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, अॅड. जी. बी. गावडे, माजी आमदार विजयराव मोरे, विश्वासराव देवकाते, डॉ. शशिकांत तरंगे, मच्छिंद्र ठवरे, भगवानराव खारतुडे, मदनराव देवकाते, बापूराव देवकाते, विश्वनाथबुवा गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली 15 समित्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. 
 
2क्क्9च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. निवडणूक झाल्यानंतर काहीच केले नाही. त्यांचा जाहीरनामा कागदावरच राहिला आहे. त्यांच्याच दारात येऊन आरक्षण मिळविण्याचा निर्धार केला आहे, असे गावडे व मोरे यांनी सांगितले.