बारामती तालुका ओबीसी सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:13 IST2021-09-15T04:13:23+5:302021-09-15T04:13:23+5:30

बारामती : एमआयडीसी येथील सुयश ऑटो कंपनीचे कामगार नेते पोपट घुले यांची बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी ...

Baramati Taluka OBC Service | बारामती तालुका ओबीसी सेवा

बारामती तालुका ओबीसी सेवा

बारामती : एमआयडीसी येथील सुयश ऑटो कंपनीचे कामगार नेते पोपट घुले यांची बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सेवा संघाचा जिल्हा स्तरीय पद नियुक्ती समारंभ व मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला. या वेळी दौड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील एकूण २१ पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी विकास भगवान साळुंके यांची एकमताने निवड करून सन्मानित करण्यात आले. इतर पदाधिकारी : बारामती:- तालुका अध्यक्ष- दादासाहेब टेंगले, उपाध्यक्ष— राहुल बनकर, संपर्कप्रमुख—नितीन मासाळ, कार्याध्यक्ष-पोपट घुले, संघटक —तुषार पवार, प्रसिद्धिप्रमुख— प्रमोद ठोबरे , सरचिटणीस —गौरव अडाने,पुरंदर तालुका सचिव —अजिंक्य बारभाई, कायदेशीर सल्लागार —मयूर राणे, दौड तालुका महिला कार्याध्यक्षा वासंती राऊत, संपर्क प्रमुख: रेश्मा शेख,दौंड शहर उपाध्यक्ष- मयूर उदावंत, सचिव- कुणाल घोलप, सरचिटणीस-विजय बारटक्के, खजिनदार-. अभय गोलांडे, कार्याध्यक्ष-. गणेश कुंभार, प्रसिद्धी प्रमुख - अक्षय अंकुश, संपर्क प्रमुख - ओम क्षीरसागर, संघटक- संदीप बहोत वाल्मीकी, आदींची निवड करण्यात आली

कामगार नेते पोपट घुले यांना बारामती तालुका ओबीसी सेवा संघ कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

१४०९२०२१-बारामती-०३

————————————————

Web Title: Baramati Taluka OBC Service