Baramati: डोक्यात, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, पतीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 19:25 IST2025-05-30T19:25:18+5:302025-05-30T19:25:18+5:30

चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार केल्याने जखमी झालेल्या विवाहितेचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला

Baramati: Stabbed in the head and face with a sharp weapon; Wife dies during treatment, case registered against husband | Baramati: डोक्यात, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, पतीवर गुन्हा दाखल

Baramati: डोक्यात, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, पतीवर गुन्हा दाखल

बारामती : एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना पुण्यात आणखी अशाच घटना घडू लागल्या आहेत. बारामतीत चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार केल्याने जखमी झालेल्या विवाहितेचे उपचारा दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. संजना लहू वायकर असे या विवाहिते चे नाव आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, याप्रकरणी महिलेचे भाऊ भगवान हनुमंत बिरदवडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी या प्रकरणी तिचा पती लहू रामा वायकर (वय ४८, रा. बांदलवाडी, ता.बारामती) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि. २५ रोजी संजना यांच्यावर पतीकडून चारित्र्याचा संशय घेत त्या कारणावरून संजना यांच्या डोक्यात, कपाळावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या संजना यांच्यावर पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Baramati: Stabbed in the head and face with a sharp weapon; Wife dies during treatment, case registered against husband