शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामती पोलिसांनी हादरवले गुन्हेगारी क्षेत्र; वर्षभरात शेकडोहून अधिक गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:55 IST

बारामती गुन्हेशोध पथकाची सर्वोत्कृष्ट कामगिरी

ठळक मुद्देपोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या या पथकाने आवळल्या मुसक्या

सांगवी: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने वर्षभरात केलेल्या धडक कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला चांगलाच हादरा बसला असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुका,शहर पोलीस,भिगवण पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तसेच परराज्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांखालील १० ते १२ वर्षांपासून पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. 

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, तसेच गुन्हेशोध पथकाचा पदभार स्वीकारताच पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया करून आपल्या पोलीस स्टाईलने गुन्हेगारांचा पर्दाफाश केला आहे. यामुळे  गुन्हेगारी विश्वपूर्णतः मोडकळीस आणले गेले. विशेषतः योगेश लंगुटे,नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे यांनी जगावर ओढावलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजारात देखील परराज्यात ठाण मांडून बसलेल्या कुख्यात गुन्हेगारांचा छडा लावत त्यांना जेरबंद केले होते. अनेक गुन्ह्यांचा कसोशीने व अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत गुन्ह्याची उकल बारामती तालुका गुन्हेशोध पथकाने केली आहे. तसेच यापुढे देखील अशा कारवायांमध्ये सातत्य ठेऊन कामगिरी बजावणार असल्याची माहिती योगेश लंगुटे यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.

वर्षभरात तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने २ खुनाचे गुन्हे उघडकीस आणून,बारामतीत हॉटेल मध्ये एका महिलेवर बलात्कार करून खून केलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन पेरॉलवरती बाहेर आला असताना १० वर्षे फरार झालेल्या आरोपीच्या गुन्हेशोध पथकाने परराज्यातून मुसक्या आवळल्या होत्या. मध्यप्रदेशसह एकूण १५ पिस्तूल हस्तगत करून म्होरक्यासह सहा आरोपींना जेलची हवा खायला पाठवण्यात आले. बारामतीतून ५० लाख रुपये किमतीचा ३१२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला होता. १० ते १२ वर्षांपासून चोरीस गेलेल्या एकुण ६५ मोटारसायकली गुन्हेशोध पथकाने हस्तगत करून त्यापैकी ३५ मोटारसायकली कर्नाटकातून ताब्यात घेतल्या होत्या. असे अनेक  गुन्हे उघडकीस आणले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसArrestअटक