शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बारामती क्राईम ब्रँचच्या कारवाईंचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 20:02 IST

सात महिन्यात ११४ अवैध धंद्यावर कारवाई

ठळक मुद्दे७ कोटी ५ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त

बारामती : बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने  अवैध धंद्यावरील कारवाईने शतक ओलांडले आहे.या पथकाने  सात महिन्यात ११४ अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ७ कोटी ५ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त  करण्यात आला आहे. कारवाईमध्ये एकुण १५ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वाधिक ४६ जुगार अड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी ९ मार्च २०१९ रोजी बारामती विभाग बारामती पुणे ग्रामीण या पदाचा कार्यभार स्वीकारला.यावेळी मीना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , पोलीस अधीक्षक  संदीप पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागामध्ये आज पर्यंत मोठ्या प्रमाणातअवैध धंद्यांवर कारवाई केली.यामध्ये बारामती विभागीतील बारामती शहर,बारामती तालुका, वडगाव निंबाळकर,इंदापुर, वालचंदनगर, भिगवण, दौड, यवत,शिरूर, रांजणगाव, शिकापुर, सासवड, जेजुरी, भोर, राजगड या वरील १५ पोलीसस्टेशन हद्दितील मोठया प्रमाणावर चालु असलेले अवैध धंदयाविषयी गोपनिय माहिती घेवुन मोठया प्रमाणात छापे घातले.संबंधितांवर गुन्हे दाखल करूनकडक कारवाई केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान या कारवाईचा मोठयाप्रमाणावर परिणाम दिसुन आला. या  कालावधीमध्ये  मिना  यांनी बारामती काईम ब्रॉच पथकाचे प्रमुख पोलीसनिरीक्षक  चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार  संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,स्वप्नील अहिवळे,  दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक भाऊसोमोरे,  रॉकी देवकाते, आणि जलद कृती दलाचे जवानांसह आज पर्यंत ११४ अवैधधंद्या कारवाई केली .नुकतेच या  कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. सदर अवैधधंद्याचे कारवाईमध्ये एकुण ७ कोटी ५ लाख ४५,९०६ रूपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.  कामगिरीची दखल घेवुन डॉ. वारके विशेष पोलीसमहानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधिक्षक  संदिप पाटील यांनी पथकाचे कौतुककरुन सर्वांना  बक्षिस जाहिर केले आहे.

 गुन्हयाचा प्रकार, कारवाई संख्या, एकूण मुद्देमाल पुढीलप्रमाणे —एनडीपीएस अ‍ॅक्ट — १ (५,८२,०००)

प्रोव्हीशन— ४५

पिटा (३५,९४,३१६)

जुगार— ४६(८५,८५,११५),

पिटा अ‍ॅक्ट  —७ (१, ४१,२२५),

जि. व. का. कलम —१(१४,१६,१६७)

प्राण्यांना क्रुरतेने वागवणे— १ (६,६६,०००)

गुटखा— ६(१८,८०,९३३)

आर्म अ‍ॅक्ट  —१ (२१,१५०)

वाळू— ४ (५,३६,५९,०००)—

एकूण ११४(७,०५,४५,९०६)

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिस