Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक लढवली तर आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव तुमचा होईल; बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:33 IST2026-04-06T13:28:36+5:302026-04-06T13:33:32+5:30

Baramati Bypoll Election काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा, बारामतीमध्ये पोटनिवडणूक न लढवता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा

Baramati Bypoll ElectionIf you contest the Baramati by-election, it will be your biggest defeat ever; Bawankule warns Congress | Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक लढवली तर आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव तुमचा होईल; बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक लढवली तर आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव तुमचा होईल; बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

पुणे : काँग्रेसने निवडणूक लढवली तर महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. तुमचा आत्तापर्यंतचा कुठं नाही झाला तेवढा मोठा पराभव बारामतीत होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. 
 
बावनकुळे म्हणाले, सर्वांच्या हृदयात आणि हृदयावर अजित दादांनी राज्य केलं. आज ही त्यांची आठवण पावला पावलावर आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सुनेत्रा ताई यांची ताकद आहे. सुनेत्रा ताई यांनी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळात छाप पाडला आहे. देवेंद्रजी यांनी सांगितलं आहे की, आपल्याला निर्णय करायचा आहे की बारामतीमध्ये सर्वाधिक मतांनी विजय होईल. मला अभिमान वाटतो की. मंत्रिमंडळात मी अजित दादांच्या शेजारी बसायचो. सुनेत्रा ताई दादांच्या सावली होत्या आणि आज त्या बारामतीच्या माऊली आहेत. काँग्रेसला विनंती आहे. त्यांना आम्ही संदेश दिला आहे की, महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजे, राजकारण राजकारणाच्या जागेवर करायचं असतं. काँग्रेसने निवडणूक लढवू नये ही जनभावना आहे. अजित पवारांचा जो जीवन प्रवास राहिला आहे तो सगळा प्रवास काँग्रेस सोबत राहिला आहे. बारामती मध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहावं. अजितदादांची जी जागा आहे ती वेगळी आहे. काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा. अजित दादांचा जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेला. काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी लढावं. माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी लढू नये. 

Web Title : बावनकुले ने कांग्रेस को चेतावनी दी: बारामती उपचुनाव में होगी करारी हार।

Web Summary : चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस को चेतावनी दी कि बारामती उपचुनाव लड़ने से उनकी सबसे बड़ी हार होगी। उन्होंने अजित पवार की विरासत का सम्मान करते हुए, सुनेत्रा पवार का समर्थन करने का आग्रह किया। बावनकुले ने सुनेत्रा पवार की क्षमताओं और बारामती के लिए एक नेता के रूप में उनकी भूमिका पर प्रकाश डाला।

Web Title : Bawankule warns Congress: Baramati bypoll will be your biggest defeat.

Web Summary : Chandrashekhar Bawankule warned Congress that contesting Baramati bypoll will lead to their biggest defeat. He urged them to support Sunetra Pawar, honoring Ajit Pawar's legacy. Bawankule highlighted Sunetra Pawar's capabilities and her role as a leader for Baramati.