शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Baramati bypoll election: मतदान केंद्रांकडे साहित्य व कर्मचारी रवाना; नव्या नियोजनानुसार थेट केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:15 IST

Baramati bypoll election: ईव्हीएम यंत्रांसह लिफाफे, फॉर्म्स आणि इतर आवश्यक साहित्य थेट मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बारामती :बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. २३) मतदान होणार असून, त्यासाठी आवश्यक मतदान साहित्य व कर्मचारी आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी, बारामती येथून ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.या अंतर्गत ४७८ मतदान केंद्रांसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स तसेच ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोद्वारे, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आली. यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले की, यापूर्वीप्रमाणे मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता, थेट त्यांच्या संबंधित मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम यंत्रांसह लिफाफे, फॉर्म्स आणि इतर आवश्यक साहित्य थेट मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी संपूर्ण मतदारसंघ ६० झोनमध्ये विभागण्यात आला असून, प्रत्येक झोनसाठी एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. एकूण ६० क्षेत्रीय अधिकारी असून, प्रत्येक अधिकाऱ्याकडे सुमारे ८ ते १० मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंटेनरची व्यवस्था करून, त्याद्वारे ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक केली जात आहे. मतदानासाठी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही, त्यांच्यासाठी ये-जा करण्यासाठी ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Bypoll: Voting Materials, Staff Dispatched; New Center Delivery System

Web Summary : Voting materials and staff dispatched to Baramati polling stations for the bypoll. New system delivers materials directly to centers, streamlining the process. Polling hours are 7 AM to 6 PM.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2026BaramatiबारामतीPuneपुणे