Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधच होईल; गोपीचंद पडळकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:00 IST2026-04-09T09:59:51+5:302026-04-09T10:00:20+5:30
baramati bypoll election राज्याचे मुख्यमंत्री या निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत, मात्र मला जर प्रचाराला बोलावले तर मी सुद्धा जाईन

Baramati Bypoll Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधच होईल; गोपीचंद पडळकर यांचा दावा
पुणे : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बोलवले तर मी जाणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही येणार आहेत. मात्र, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोधच होणार आहे, असा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. पडळकर बोलत होते. ते म्हणाले, बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच होणार आहे. त्या ठिकाणी काँग्रेसने का उमेदवार दिला हा त्यांचा प्रश्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री या निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत, मात्र मला जर प्रचाराला बोलावले तर मी सुद्धा जाईन.
सध्या 'लव्ह जिहाद' सारखाच 'कॉर्पोरेट जिहाद' समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्धपणे लैंगिक अत्याचार होत आहे. त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहेत. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार घडत असल्यास संबंधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील एका कंपनीत एका तरुणाचा धर्मांतराचा प्रकारही समोर आला आहे, असेही पडळकर म्हणाले.