शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट

By admin | Updated: September 17, 2016 00:59 IST

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला.

पिंपरी : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला. भेगडे यांच्या खुनानंतर कोर्टाच्या कामासाठी पैशांची आवश्यकता भासणार असल्याने तळेगाव येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असताना १२ आरोपींना हत्यारासह अटक केली. यातील दोघे जण फरार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. वडगाव न्यायालयाने बाराही आरोपींना १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.मयूर उर्फ बंटी नामदेव टकले (वय २८, रा. तळेगाव दाभाडे), जावेद उर्फ बाबा अब्दुल बागेवाडी (३८, रा. आकुर्डी), अखिलेश काळूराम गायकवाड (२३, रा. जांबे), सचिन सुरेश गरुड (२७, रा. तळेगाव दाभाडे), शंकर सत्यनारायण भालके (२२, रा. तळेगाव दाभाडे), रोहन उर्फ सनी चंद्रकांत गरुड (२७, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे), निखिल गुलाब घोडके (२६, रा. लिटिल हार्ट, तळेगाव दाभाडे), अविनाश उर्फ बुटल्या राजू भालेकर (२३, रा. साने आळी, तळेगाव दाभाडे),अहमद उर्फ शाहीद चॉँद शेख (२१, रा. वडगाव मावळ), व्यंकटेश उर्फ नाना केशू राठोड (२१, रा. तळेगाव दाभाडे), अजिंक्य महादेव सरोदे (२३, रा. तळेगाव दाभाडे), आदित्य गणेश भेगडे (२०, रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हेमंत उर्फ सोन्या बाबूराव बडदे (रा. चिखली), बाळू पंढरीनाथ टकले (रा. तळेगाव दाभाडे) हे आरोपी पळून गेले आहेत. (प्रतिनिधी)