शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा आले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:48 IST

जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले. सकाळपासूनच घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाने गणेश मूर्ती आणताना गुलालांची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मूर्तींची स्थापना केली.जालना शहरात गणेश चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच बच्चे कंपनींसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. नवीन आणि जुना जालना भागातील शनि मंदिर, बाजार चौकी पोलीस ठाणे, गांधी चमन, महात्मा फुले मार्केट, नरीमन रोड आदी भागांमध्ये गणपती मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे वातावरणात जल्लोष भरला होता. अनेक भक्तीगीते, भावगीतांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. नवीन जालना भागातील काद्राबाद परिसरात मानाच्या गणपतीची सायंकाळी अध्यक्ष राजेंद्र आबड आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. जालना नगर परिषदेमध्येही गणपती स्थापना विधीवत करण्यात आली. विनायक महाराज फुलंब्रीकर, विजय फुलंब्रीकर यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी श्रींची स्थापना केली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह मुख्याधिकारी संतोष खांडेकर तसेच पालिकेतील अन्य विभागप्रमुख, नगरसेवकांची उपस्थिती होती. बडीसडक, शिवाजी पुतळा परिसरात रात्री उशिरापर्यंत गणेशाच्या मोठ-मोठ्यामूर्तींचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. काही भागांतून वाहतुकीची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.मंत्रोच्चारात राजुरेश्वराची महापूजाराजूर : गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, राजूर गणपती संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष गोरड व गजानन पुंगळे यांच्याहस्ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजुरेश्वराची मंत्रोच्चारात महापूजा करण्यात आली. यावेळी जोरदार पावसासाठी राजूरेश्वराला साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याहस्ते श्रीस मुकुट, वस्त्रालंकार चढवून महाआरती करण्यात आली.जालना जिल्ह्यात यावर्षी ८९६ गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाभरातून यासाठी १ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी ८९६ मंडळांना परवागी देण्यात आली. यातील ८ मंडळांची परवागी रद्द करण्यात आली. ८३ जणांना परवगी देणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गणेश उत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांनी लाऊडस्पीकर तसेच ढोल ताशांच्या ठेक्यावर युवकांनी चांगलाच ताल धरल्याचे दिसून आले. आया है राजा... लागो रे लोगो... देवा श्री गणेशा.. या गाण्यासह अनेक हिंदी, मराठी गीतांनी श्रींचे स्वागत करण्यात आले.परंपरागत वेशभूषागणपतीची स्थापना करण्यासाठी अनेकांनी परंपरागत वेशभूषा केली होती. मूर्ती आणण्यासाठी प्रथम मूर्तीची आरती फेटा आणि टोपी घालून करण्यात येत होती. मकर सजावटीनेही अनेकांचे लक्ष वेधले होते.

 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Religious programmeधार्मिक कार्यक्रम