खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST2021-07-29T04:12:19+5:302021-07-29T04:12:19+5:30

पुणे : पाठलाग करून तरुणावर तलवार आणि पालघनने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज ...

The bail application of both the accused was rejected | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पाठलाग करून तरुणावर तलवार आणि पालघनने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा आदेश दिला.

अशितोष सुभाष अडागळे (वय २२) आणि कुणाल ऊर्फ सोनबा संजय चांदणे (वय १९) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. वनराज महेंद्र जाधव (वय १९, रा. येरवडा) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी १ जुलै रोजी फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्यावर तलवार आणि पालघनने वार केले. तसेच त्यांच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड केली, असे फिर्यादीत नमूद आहे. अटक झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. चांदणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अँड. पाठक यांनी केला.

--------------------------------------------------------

Web Title: The bail application of both the accused was rejected