Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:23 PM2024-05-22T16:23:42+5:302024-05-22T16:24:23+5:30

पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत विशाल अगरवालची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती

Baby's father Vishal Aggarwal remanded to 3 days police custody | Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Pune Porsche Accident: बाळाचे वडील विशाल अग्रवालला ३ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य विक्री प्रकरणात हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्यापाठोपाठ मुलाचे वडील विशाल अगरवाल याला २४ तारखेपर्यंत पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.

 दरम्यान, याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये विशाल अग्रवाल 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर हॉटेल ‘ब्लॅक' चे असिस्टंट मँनेजर संदीप रमेश सांगळे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे. काल त्या तिघांनाअटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज विशाल अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

अपघातानंतर विशाल पसार झाला होता. त्याला छत्रपती संभाजीनागमधून ताब्यात घेण्यात आले होते. आज त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सरकारी वकिलामार्फत युक्तीवाद केला. त्यामध्ये ब्लॅक पब चे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला. विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला?  गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सगळ्या गोष्टीसाठी तपास करण्यासाठी सरकारी वकील यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करत ३ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 

Web Title: Baby's father Vishal Aggarwal remanded to 3 days police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.