बारामती शहरात भरदिवसा कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:53 PM2022-08-18T18:53:07+5:302022-08-18T18:56:19+5:30

शहरात भरदिवसा धारदार हत्याराने वार करून हत्या...

Ax murder in broad daylight in Baramati city pune crime news | बारामती शहरात भरदिवसा कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून

बारामती शहरात भरदिवसा कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून

googlenewsNext

बारामतीबारामती शहरात भरदिवसा ५० वर्षीय इसमाचा खून झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १८) घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. कुऱ्हाडीने वार करुन या इसमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. सायंकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. शशिकांत कारंडे असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला आहे. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेत आले होते. याच दरम्यान हा प्रकार घडल्याचे समजते.

कारंडे यांच्या मुलांची पुर्वी भांडणे झाली होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. कारंडे हे बारामती लघु औद्योगिक वसाहतीत एका पाईप कंपनीत नोकरीला आहेत.

Web Title: Ax murder in broad daylight in Baramati city pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.