शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सगळ्या गावांचे सरासरी उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीचा फटका बसल्यानंतरही जिल्ह्यातील १ हजार ९२५ गावांपैकी सर्वांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा जास्तच आहे. खरीप हंगामाच्या सरकारी पाहणीनंतर नुकताच पैसेवारीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त निदर्शनास आली आहे.

जिल्ह्यात पुणे शहरासह १५ तालुके आहेत. त्यात मिळून १ हजार ९२५ गावे आहेत. त्यातील दौंड, बारामती व इंदापूर हे तीन तालुके रब्बी हंगामाचे आहेत. त्या तालुक्यातील ५४३ गावे खरीप हंगामात जमेस धरत नाहीत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व हवेली तालुक्यातील काही गावे शहरी हद्दीत समाविष्ट आहेत. काही तालुक्यांमधील गावे ओसाड आहेत. काही गावे धरणासाठी संपादित झाली आहेत. अशा एकूण गावांची संख्या ६९ आहे. त्याशिवाय उर्वरित १२ तालुक्यात मिळून १ हजार ३७९ गावे खरीप हंगामाची आहेत. तिथे पैसेवारी मोजली जाते.

दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारी मदत देण्यासाठी म्हणून गावांची पैसेवारी मोजली जाते. त्यासाठी त्या गावांचे मागील १० वर्षांचे सरासरी उत्पन्न काढतात. आपत्तीमध्ये त्यापेक्षा कमी उत्पन्न होत असेल तर ते गाव दुष्काळी जाहीर केले जाते व त्याला त्वरित सरकारी मदत मिळते. सप्टेबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर सरकारने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात असे एकही गाव आढळलेले नाही.

एकूण १ हजार २९८ गावांची पाहणी करून सन २०२०-२१ साठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पैसेवारी जाहीर करण्यात आली. पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या ६२४ आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वच तालुक्यांमधील गावांना बसला होता. त्याचे पंचनामे होऊन त्यांना त्याची नुकसानभरपाईही मिळू लागली आहे. मात्र, थेट दुष्काळ किंवा सरासरी उत्पन्न घटले असे एकही गाव पैसेवारीनुसार जिल्ह्यात नाही.