Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:34 IST2024-08-20T12:34:05+5:302024-08-20T12:34:49+5:30

मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता, मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले

Attempt to molest a minor girl at school in Pune The girl ran away | Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

किरण शिंदे

पुणे : शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री (वय १९) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानी पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला. 

घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात ७४, ७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Attempt to molest a minor girl at school in Pune The girl ran away