खेड शिवापूर पोलिस चौकीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यालाच जिवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 08:09 PM2024-05-14T20:09:33+5:302024-05-14T20:12:21+5:30

मारहाण करून पोलिस चौकीमधील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Attempt to kill a policeman in Khed Shivapur police post, case registered | खेड शिवापूर पोलिस चौकीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यालाच जिवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

खेड शिवापूर पोलिस चौकीमध्ये पोलिस कर्मचाऱ्यालाच जिवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

खेड शिवापूर (पुणे) : कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून पोलिस चौकीमधील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलिस चौकीमध्ये राहुल कोल्हे हे पोलिस कर्मचारी रविवारी काम करीत असताना रोहन साळवे (रा. कल्याण, ता. हवेली) याने अनधिकृतरीत्या पोलिस चौकीमध्ये घुसून कोल्हे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यामध्ये खुर्ची घालून मारहाण केली.

त्याचप्रमाणे पोलिस चौकीमध्ये असलेले संगणक व इतर साहित्य फेकून नासधूस करून सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या वस्तूंची तोडफोड केली. घटनेनंतर सदर आरोपी फरार झाला असून, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Attempt to kill a policeman in Khed Shivapur police post, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.