विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 25, 2015 23:26 IST2015-02-25T23:21:51+5:302015-02-25T23:26:14+5:30

घरगुती भांडणातून सासरा व पतीने विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी कनेरसर

An attempt to burn a marriage alive | विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

राजगुरुनगर : घरगुती भांडणातून सासरा व पतीने विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी कनेरसर (ता. खेड) येथे घडली. या दुर्घटनेत विवाहित महिला ९० टक्के भाजली असून, तिला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी तिचा सासरा व पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही.
शकुंतला विठ्ठल दौंडकर (वय २८ वर्षे, रा. दरावस्ती, कनेरसर, ता. खेड) असे या पीडित विवाहित महिलेचे नाव आहे. तिचा सासरा आणि पती वारंवार दारू पिऊन शिवीगाळ करत असत आणि मारहाणही करत असत. मंगळवारी ती स्वयंपाक करीत असताना सासऱ्याने तिला ‘तू मला शिळ्या भाकरीचे तुकडे खायला देते’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. शेवटी त्याने मागून येऊन रॉकेलचे कॅन तिच्या अंगावर ओतले. सासऱ्याने शकुंतला हिच्या अंगावर रॉकेल टाकल्यावर तिच्या नवऱ्याने पेटवून दिले. नवरा विठ्ठल दौंडकर याने तिला, पोलिसांना कळविले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांवरही भा.दं.वि. कलम ३०७,३२३, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: An attempt to burn a marriage alive