शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणाच्या कारणावरून पत्नीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करत दुकानदाराच्या पत्नीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : जुन्या भांडणाच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करत दुकानदाराच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना संतोषनगर, भाम (ता. खेड) येथील कर्ण सुपर मार्केट दुकानासमोर गुरुवारी (दि.९) १० च्या सुमारास घडली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी शिरोली येथील दहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला.

गुलाब बाबूराव कड (वय ५७, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांची पत्नी (नाव समजले नाही) या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. कड यांच्या फिर्यादी वरून वैभव शिवेकर, प्रमोद सावंत, विनायक सावंत, गुलाब शिवेकर, कुमार शिवेकर, अक्षय शिवेकर, सोमनाथ सावंत, गुलाब शिवेकर यांची पत्नी (नाव समजले नाही.) व अन्य अनोळखी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब कड यांचे संतोषनगर, भाम येथे कर्ण सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी १०.३० च्या दरम्यान वरील लोकांनी दुकानाच्या समोर येवून बेकायदेशीरपणे जमाव जमवून राडा केला.

वैभव शिवेकर याने यावेळी गुलाब कड यांच्या पत्नीस शिवीगाळ दमदाटी करत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तर प्रमोद सावंत याने हातातील लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनास्थळावर जमावात सहभागी असलेल्या शिरोलीतील अन्य लोकांनी संबंधित महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.