शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकाळभोर येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 20:34 IST

लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचा-यांवर हडपसर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

लोणीकाळभोर : पुणे जिल्हा ट्रोसिटी विशेष न्यायालय यांच्या आदेशाप्रमाणे लोणी काळभोरपोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचा-यांवर हडपसर येथील पोलीस स्टेशनमध्ये अनूसुचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.      याप्रकरणी विजय गायकवाड (वय ३९ ,रा.मार्केट यार्ड पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असुन, हडपसर पोलीस स्टेशन मध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस हवालदार सोमनाथ क्षीरसागर व पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्या  विरोधात शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.          या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालु असलेले बेकायदेशीर अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे व त्या अवैध धंद्याचे बेकायदेशीर हप्ते वसुल करणारे पोलीस हवालदार सोमनाथ क्षीरसागर ,पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व इतर विविध मागण्या करिता रिपब्लिकन परिवर्तन सेना प्रदेशाध्यक्ष विजय गायकवाड यांनी ५ सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले होते.हलगीनाद आंदोलन गायकवाड करणार असल्याने त्याचा राग मनात धरुन क्षीरसागर व कामठे यांनी दिनांक  ७ सप्टेंबर या दिवशी ऑनड्युटी असताना गायकवाड यांना वारंवार फोन करून हडपसर येथे बोलावले. यावेळी साध्या गणवेशात आलेले कामठे व क्षीरसागर यांनी गायकवाड यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले.

आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने त्या दोघांनी त्यांचा अपमान करुन जातीवाचक अपशब्द वापरुन आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकला. यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. आपल्या तक्रारीची पोलीस दखल घेत  नसल्याने गायकवाड यांनी पुणे जिल्हा अ‍ॅट्रोसिटी विशेष न्यायालय या न्यायालयमध्ये न्याय मिळण्यासाठी अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंर्तंगत व इतर भारतीय संविधान कायद्याअंतर्गत खटला दाखल केला. यावर न्यायालयाने  लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोमनाथ क्षिरसागर व पोलीस शिपाई शिरीष कामठे यांच्या विरोघात अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर करीत आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिस