यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:44 IST2025-06-24T15:42:30+5:302025-06-24T15:44:38+5:30

येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात.

ashadhi wari welcomed with enthusiasm at Yamai Shivri; The ceremony of the supernatural gift of the goddess's shoes and Yamai Devi is completed | यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

जेजुरी - श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा दोन दिवसाचा पाहुणचार उरकून मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीकडे सकाळी ७वाजता मार्गस्थ झाला. दुपारी १ वाजता श्री क्षेत्र यमाई शिवरी येथे विसावा संपन्न झाला.यावेळी विविध मान्यवर,ग्रामस्थ,भाविकांच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ,निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे,सारिका इंगळे,दत्तात्रेय झुरंगे,बबनराव कामथे,सरपंच प्रमोद जगताप,यमाई माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नवनाथ कामथे,उपाध्यक्ष वासुदेव लिंबोरे,राजेंद्र क्षिरसागर,ज्ञानेश्वर कामथे,धनंजय कामथे ग्रामसेविका शीतल भुजबळ,तुकाराम कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.

 यावेळी सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस,पोलिस पाटील,देवस्थान,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक स्वयंसेवक यांनी दर्शनाची व्यवस्था पाहिली. येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात.येथे अभिषेक,महापूजा,महानैवेद्य आदी विधी संपन्न होतात.यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ,सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे,स्वामीदास गणेशांनंद महाराज सर्व विश्वस्त उपस्थित होते. शिवरी, खळद, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज,निळुंज, शिंदेवाडी, तक्रारवाडी, पांगारे, भाटमळवाडी सह परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: ashadhi wari welcomed with enthusiasm at Yamai Shivri; The ceremony of the supernatural gift of the goddess's shoes and Yamai Devi is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.