संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:46 IST2025-06-28T20:45:55+5:302025-06-28T20:46:36+5:30
सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या
बारामती - संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि २८) बारामती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.यावेळी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी शारदा प्रांगणात पालखी सोहळा विसावला. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.
यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर,तहसिलदार यांनी प्रशासनाच्या वतीने तर बारामती नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी पालखी सोहळ्याचे, पालखी सोहळा प्रमुख त्रिभुवन गोसवी यांचे स्वागत केले.तसेच पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पुजन केले. यावेळी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी विठुनामाच्या गजराने परिसर दुमदुमला.तसेच धो.आ.सातव विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी बारामती नगरपरीषदेेचे उद्यान विभाग प्रमुख महेश आगवणे, उपमुख्याधिकारी गोरख वायाळ,सहायक कार्यालय पर्यवेक्षक संजय चव्हाण,कार्यालय पर्यवेक्षक आश्वीनी अडसुळ,लेखाधिकारी तुषार माेरे आदी उपस्थित होते.बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आण्णासाहेब शितोळे देशमुख मित्र परीवाराच्या वतीने गावरान तुपातील लापशी,गावरान तुपातील सांबर,जिरा राइस,मिक्स व्हेज,भेंडी आदी पदार्थांचर वारकरी भाविकांसाठी रुचकर भोजनाची साेय केली.तसेच बारामती तालुका दूध उत्पादन संघाच्यावतीने वारकरी भाविकांना केळी, बिस्कीट आणि पाणी वाटपाचा उपक्रम राबविला.