शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 00:40 IST

झील एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या इंजीनियरिंग, तंत्रनिकेतन, एमबीए, एमसीए कॉलेजमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपये भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने अटक केली

पुणे : कामावर नसतानाही बनावट स्टाफ दाखवून त्याआधारे जादा फी मंजूर करुन घेऊन विद्यार्थी व शासनाची ४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी झील एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर यांच्यासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.झिल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मारुती काटकर (वय ६५, रा. हिंगणे खुर्द सिंहगड रोड), झील पॉलिटेक्निकचे तत्कालिन प्राचार्य चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय ५८, रा. दत्तनगर, कात्रज) आणि ऑडिटर युवराज विठठल भंडारी (वय ३५, रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झील पॉलिटेक्नीक कॉलेजची फी मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात बनावट अडीचशे स्टाफ नोकरीवर असल्याचे दाखविण्यात आले. त्यांना पगार दिल्याचे दाखवून खोटी पगार पत्रके तयार केली. ती फी मंजूरीसाठी मुंबईतील शुल्क निर्धारण समिती यांना सादर करण्यात आले. त्या आधारे शिक्षण शुल्क समिती कडून फी मंजूर करुन घेत आरोपींनी विद्यार्थ्यांकडून जास्त फीची आकारणी केली. झील एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या झील पॉलिटेक्नीक कॉलेजने २०१५- १६ या शैक्षणिक वर्षात तब्बल ४ कोटी २५ लाख २९ हजार ४८२ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झालेले आहे.झिल एज्युकेशन सोसायटीचे अंतर्गत असलेल्या इंजिनिअरींग कॉलेज, एम.बी.ए कॉलेज, एम.सी.ए.कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्येही अनेक वर्षे अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. या तपासात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. करण्यात येत आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.असा उघडकीस आला गैरव्यवहारझील संस्थेचे अध्यक्ष संभाजी काटकर यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याच संस्थेतील कार्यालयीन अधीक्षक योगेश ढगे याच्याविरुद्ध ९ लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी २०१९ मध्ये अटक केली होती. त्यामुळे ढगे याने संस्थेच्या गैरव्यवहाराचा पोलखोल केला. त्याने विविध तपास संस्थांना सर्व कागदोपत्री पुरावेच सादर केले होते. झील संस्थेच्या एका कॉलेजमधील केवळ एका वर्षातील हा सव्वा चार कोटींचा गैरव्यवहार आहे. त्यांची इतरही काही कॉलेजच आहेत. या गैरव्यवहाराचा मुळातून शोध घेतल्यास तो ४० ते ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे. झील संस्थेवरील कारवाईनंतर अन्य संस्थांची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरही शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीPoliceपोलिसCourtन्यायालय