शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या खूनप्रकरणी फरारीस अटक

By admin | Updated: June 29, 2015 23:39 IST

दीड महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून मित्राचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला नारायणगाव पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे़

नारायणगाव : दीड महिन्यापूर्वी अनैतिक संबंधातून मित्राचा खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला नारायणगाव पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे़ लक्ष्मण तुळशीराम कारंडे यांच्या खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे़ या सर्वांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता जुन्नर न्यायालयाने त्यांना २ जुलै २०१५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली़ लक्ष्मण तुळशिराम कारंडे (वय ४५, मुळ गाव साकुर मांडवा (दरेवाडी) ता़संगमनेर सध्या रा़येडगाव (गणेशनगर) ता. ज़ुन्नर) यांचा खून केल्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेला पिराजी भाऊ कारंडे (वय ४७) यास नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून कादंळी येथे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अटक केली़ यापूर्वी नारायणगाव पोलिसांनी २४ जूनला राहुल भिमाजी औटी (वय २३, रा़ साळवाडी, ता. ज़ुन्नर) आणि समीर अशोक कोल्हे (वय २१, रा़ कोल्हेमळा नारायणगाव, ता़ ज़ुन्नर) यांना अटक करण्यात आली होती़ या संदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी सांगितले, की लक्ष्मण तुळशिराम कारंडे यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पिराजी कारंडे हा गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता होता़ त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती. पिराजी हा साकुर मांडवे येथून भाडयाचे गाडीने वडगाव कांदळी येथे त्याची पत्नी व मुलांना भेटण्यास येणार असल्याची खबर मिळाल्याने नारायणगाव पोलिसांनी आळेफाटा येथे सापळा रचून त्याचा माग काढत पुणे नाशिक महामार्गावरील कादंळी फाटा येथे पोलीस हवालदार आबा चांदगुडे, शंकर भवारी यांनी पिराजी कारंडे यास अटक केली़ या तिघांनी संगनमताने लक्ष्मण तुळशिराम कारंडे यांचा नारायणगावातील कोल्हे मळयाजवळील गायकवाड मळयात डिंभा कालव्याजवळ गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी लक्ष्मण हा बेशुध्द झाला होता़ त्याला या तिघांनी गाडीत टाकून जांबूत फाटा मार्गे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे नेत असताना लक्ष्मण याने थोडी हालचाल केली़ त्यावेळी पिराजी कारंडे याने मफलरच्या साहयाने त्याचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह कुकडी नदीत फेकून दिला होता़