केडगाव मध्ये सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:10 IST2021-01-25T04:10:57+5:302021-01-25T04:10:57+5:30

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत जवळपास २ तोळे सोने व ५२ हजाराचा ...

Armed robbery in Kedgaon | केडगाव मध्ये सशस्त्र दरोडा

केडगाव मध्ये सशस्त्र दरोडा

केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत जवळपास २ तोळे सोने व ५२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि २२) रोजी पहाटे घडली.

या प्रकरणी रायबा पोपट पवार यांनी तक्रार दिली आहे. रायबा पोपट पवार (वय ६८ राह.केडगाव) हे शुक्रवारी रात्री कुटुंबियासोबत घरात झोपले होते.

पहाटेच्या सुमारास किचनमध्ये आवाज आला म्हणून रायबा पवार यांना जाग आली. पवारांनी कुटुंबातील इतरांना उठवले. त्यांच्या खोलीचा दरवाजा बेडशीटने बांधल्याने त्यांना बाहेर येता येत नव्हते. त्यावेळी चोरट्यांनी महिलांना हातातील शस्त्राचा धाक दाखवला. अंगातील सोने ओरबडले व कपाटातील ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोर जास्त असल्याने पवार कुटुंब प्रतिकार करू शकले नाही. शनिवारी रायबा पवार यांनी या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात केडगाव परिसरामध्ये चोरट्यांनी आठवड्याच्या अंतरामध्ये दहा सदनिका फोडल्याच्या घटना घडल्या होत्या.

Web Title: Armed robbery in Kedgaon