दारू पिऊन वाद; बापाने कापडी गमचाने गळा आवळत डोके फरशीवर आपटून केला मुलाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:27 IST2025-07-21T16:26:55+5:302025-07-21T16:27:30+5:30
दारू पिऊन आल्यावर मुलाने आई-वडिलांना शिवीगाळ करत झटापट करण्यास सुरूवात केली

दारू पिऊन वाद; बापाने कापडी गमचाने गळा आवळत डोके फरशीवर आपटून केला मुलाचा खून
पुणे : घरात दारू पिऊन आलेल्या मुलाने आई-बापाशी वाद घातला. यात झालेल्या झटापटीत बापाने मुलाचा कापडी गमचाने गळा आवळून त्याचे डोके फरशीवर आपटले. यात मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत सुरेश जमदाडे (३५, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी) असे मयताचे नाव आहे. तर सुरेश बाबुराव जमदाडे (५९)असे बापाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास प्रशांत हा घरात दारू पिऊन आला. त्यावेळी घरामध्ये त्याचीआई शारदा आणि वडील सुरेश हे दोघेही होते. प्रशांतने आई-वडिलांना शिवीगाळ करत झटापट करण्यास सुरूवात केली. यावेळी चिडलेल्या बापाने मुलाचा गळा कापडी गमचाने आवळून त्याचे डोके जिनीवरील फरशीवर आपटले. यात प्रशांतचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांतचा मेव्हणा मनोहर ताबाजी डोके (३६, रा. फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात सासऱ्याविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहेत.