शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांकडून क्षेत्रनिश्चिती नाही

By admin | Updated: October 12, 2015 01:37 IST

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्यान्वये नगरसेवकांना शहरामध्ये क्षेत्रसभा घेण्याकरिता प्रत्येक प्रभागातील क्षेत्रनिश्चिती करून देण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असून

दीपक जाधव, पुणेमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्यान्वये नगरसेवकांना शहरामध्ये क्षेत्रसभा घेण्याकरिता प्रत्येक प्रभागातील क्षेत्रनिश्चिती करून देण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असून, त्यांनी एकाही प्रभागातील क्षेत्रनिश्चिती करून दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.काही नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेण्याची तयारी करून त्याबाबतच्या तरतुदींचा अभ्यास केला असता हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर त्यांनी तातडीने ही बाब आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियिम कायदा १९४९मध्ये २००९मध्ये दुरुस्ती करून कलम २९ क अन्वये प्रत्येक नगरसेवकाने दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक केले आहे. रस्ते, पाणी, साफसफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोई सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी, अपेक्षा जाणून घेणे व त्याची सोडवणूक करणे ही तरतूद केली. या क्षेत्रसभा न घेतल्यास संबंधित नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील १५० नगरसेवकांनी या क्षेत्रसभाच घेतल्या नसल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते हे ‘लोकमत’ने उजेडात आणले. त्यानंतर क्षेत्रसभा घेण्यासाठी नगरसेवकांची एकच धावपळ सुरू झाली. खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने १४ सप्टेंबर २०१५ रोजी सर्व नगरसेवकांना एक पत्र पाठवून तातडीने क्षेत्रसभा घेण्याचे आदेश दिले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, भाजपाचे दिलीप काळोखे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, मनसेचे वसंत मोरे यांनी क्षेत्रसभा घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी मनसेच्या सर्व नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांची भेट घेऊन क्षेत्रनिश्चिती करून देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही, क्षेत्रनिश्चिती करून न देता त्यांना क्षेत्रसभा घेण्यास सांगणे योग्य नसल्याचे नगरसेवक अजय तायडे यांनी कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.